© २०१३ श्री भार्गव फायबर्स
सिमेंट व बांबूचे संयुत
इतर मध्यस्थी मालाचा वापर करत बांबू व पोर्टलंड सिमेंटचे संयुत बनवता येते. प्रथम आम्ही १५ सेंटिमीटर रुंद व १५ सेंटिमीटर लांबीचे बांबू-सिमेंटचे तयार खांब बनवले. असे खांबांचे काम यशस्वी झाल्यानंतर आम्ही मुद्दाम बनवलेली तावदाने, कैंची वापरून सहा गुणिले चार गुणिले दोन मीटर या मापाची पूर्ण खोली बनवली. ही खोली अगदी स्वस्तात आणि थोडक्या वेळात बांधली गेली.