© २०१३ श्री भार्गव फायबर्स
मॅग्नेशियम सिमेंट वापरून बांधकाम
पोर्टलंड सिमेंट वापरात येण्याच्या पूर्वी मॅग्नेशियम सिमेंट हेच वापरात होते. चीनभोवतीची विशाल भिंत आणि दक्षिण भारतातील काही देवळांच्यात हे वापरले गेलेले आहे. ते तीन प्रकारचे असते:
A. मॅग्नेशियम ऑक्सिक्लोराइड.
B. मॅग्नेशियम ऑक्सिसल्फेट,
C. मॅग्नेशियम ऑक्सिफॉस्फेट.
ही मॅग्नेशियम सिमेंट दोन घटकांची बनलेली असतात आणि वनस्पतींच्या धाग्यांनी व्यवस्थित चिकटवली जातात. आम्ही योग्य ते साचे वापरून बांधकामासाठी उपयुक्त असे बांबूंनी आत बळकटी दिलेले भिंतीची तावदाने, कैंची व पर्लीम हे घटक बनवले. असे 17 घटक वापरून चार मीटर गुणिले चार मीटर गुणिले दोन मीटर आकाराचे बांधकाम केले. योग्य असे स्थानिक पदार्थ वापरत यावर गिलावा करता येतो. याचा एकच तोटा म्हणजे ते पाण्याला नीट तोंड देऊ शकत नाही.