© २०१३ श्री भार्गव फायबर्स
पट्ट्यांची/ फळ्यांची जाळी
NFC अथवा नैसर्गिक धागे संयुत: धाग्यांना धागे आणि धाग्यांना राळ एकत्र चिकटून जे घट्ट मिश्रण तयार होते तो तुलनेने हलका व चांगला चिवट संयुक्त पदार्थ आहे.
बळकटी देण्यासाठी योग्य जातीचा बांबू निवडल्यास धातूइतकाच चिवट पदार्थ तयार होऊ शकतो. वेगवेगळ्या आकाराचे साचे वापरून वेगवेगळ्या आकाराची आणि वेगवेगळ्या उपयोगांना योग्य अशी उत्पादने बनवता येतात.
पट्ट्यांच्या जाळ्या, चरांवरची झाकणे, फळ्यांनी बनवलेले चालत जाण्याचे मार्ग, जिन्याच्या पायऱ्या ही भार्गवांची नवी उत्पादने आहेत. ही सर्व उत्पादने काही ठरीव तसेच मागणीप्रमाणे बनवलेल्या आकारांच्यात उपलब्ध आहेत.
किती बळकट असणे अपेक्षित आहे त्याप्रमाणे वेगवेगळ्या जाडीचे तसेच UV प्रतिरोधक खास रंग दिलेले उत्पादन उपलब्ध आहे.
पट्ट्यांच्या जाळ्या पाण्याला, सडण्याला आणि वाळवीला समर्थपणे तोंड देतात; त्या समुद्रात आणि इतर दमट ठिकाणांसाठी वापरण्यासाठी उपयुक्त आहेत. त्यांच्यावर आम्ल, अल्कली, रंग किंवा रसायनांचे दुष्परिणाम होत नाहीत.
NFC अथवा नैसर्गिक धागे संयुत हा पोलाद, अॅल्युमिनिअम लाकूड किंवा प्लास्टिक यांच्याशी तुलना करता हलका, वाजनेच्या तुलनेत खूप जास्त बळकट आणि न झिजणारा असा श्रेष्ठ गुणवत्तेचा पदार्थ आहे.