© २०१३ श्री भार्गव फायबर्स
पॅलेट
वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पादनात फळ्यांचे चपटे कप्पे अथवा पॅलेट फार महत्वाचे बनलेले आहेत. याचे कारण म्हणजे ते वापरत वेगवेगळे पदार्थ हाताळता आणि हलवता येतात. परंतु नेहमीच्या वापरातील लाकडी पॅलेट हे फुगतात, वापरात असताना मोडतात, कुजतात आणि वाळवीला बळी पडतात.
शिवाय आज चांगल्या दर्जाचे लाकूड मिळणे कठीण झाले आहे. अल्युमिनिअम किंवा स्टेनलेस स्टील हे जास्त जड व खर्चिक असल्यामुळे हे पर्याय वापरणेही कठीण आहे.
भार्गव फायबर्स यांनी आता नैसर्गिक धाग्यांपासून बनवलेले संयुत हा उत्तम पर्यायी संयुक्त पदार्थ पुढे आणला आहे. यापासून बनवलेले पॅलेट हे प्लास्टिक किंवा पॉलीफायबर पॅलेटपेक्षा जास्त बळकट, जास्त टिकाऊ आणि पर्यावरणाच्या दृष्टीने हितकारक आहेत. हे कारखाने, दुग्धालय, औषधी उत्पादन, अन्न व माशांवरील प्रक्रिया, शीतगृहे आणि अशा अनेक उद्योगात उपयुक्त आहेत.
इंजीनियरिंग उद्योगांसाठीही NFC अथवा नैसर्गिक धागे संयुत हे इतर मालापेक्षा/ पदार्थांपेक्षा जास्त बळकट व स्वस्त ठरतात. ही पॅलेट वेगवेगळ्या रासायनांनाही नीट तोंड देऊ शकतात.
तेल, वंगण, आम्ल, अल्कली आणि अशा इतर दमट ठिकाणांसाठी वापरासाठी ही पॅलेट सुयोग्य आहेत. ती पूर्णपणे टिकाऊ आहेत, आणि त्यांना डागडुजीचा काहीही खर्च येत नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे काहीही कटकट न होता ती वापरता येतात.
NFC पॅलेट अनेक प्रकारे सरस आहेत:-
ही वाकत नाहीत आणि त्यांचा आकार टिकून राहतो. त्यामुळे आधार न दिलेली, किंवा भार टाकलेली NFC पॅलेट सरळ राहतात. उलट प्लास्टिक पॅलेट सहज वाकतात व मोडतात आणि त्यामुळे इंजिनिअरिंग उत्पादने बनवण्याला ती कुचकामी ठरतात.
म्हणून एका जागी भार पेलण्यासाठी NFC पॅलेट इतर पर्यायांहून सरस ठरतात.
ही NFC पॅलेट वर्षानुवर्षे टिकतात आणि त्यामुळे पुन्हा पुन्हा विकत घेण्याचा खर्च वाचतो