© २०१३ श्री भार्गव फायबर्स
उपयोग
लांब बळकट धाग्याने बनलेला, चिवट बांबू हा बांधकाम, फर्निचर, विणकाम अशा रचनात्मक वापरांसाठी खूप उपयुक्त आहे. असा वापरण्यासाठी त्यावर शक्य तोवर बोरिक अॅसिड सारखे रसायन घुसवून उपचार करणे आवश्यक आहे. असे केल्यास त्यातील पांढरट / पिवळट चिकट भाग काढून टाकला जाऊन बांबू खूप वर्षे टिकतो.
बांबूचा वापर करताना त्याला व्यवस्थित सांधा अथवा जोड देणे हे फार महत्वाचे आहे. ह्यासाठी स्टेनलेस स्टील किंवा प्लेट केलेले स्टेनलेस स्टील वापरावे. असे बनवलेले बांबूचे उत्पादन टणक असते आणि खूप टिकते. गिरमिटाने भोके पाडणे व नट आणि बोल्ट वापरणे हेही योग्य आहे.