© २०१३ श्री भार्गव फायबर्स
काढणी
महाराष्ट्रातील पावसावर पोसलेल्या बांबूंना साधारण जुलै आणि ऑगस्ट या महिन्यात खालच्या कंदांपासून नवे कोंब फुटू लागतात. महाराष्ट्रातील बहुतेक बांबू हे एकाला एक चिकटून दाटीवाटीने बेट किंवा रांजी बनवतात.
असे बेटात वाढलेले बांबू साधारण तीन पावसाळ्यानंतर वापरण्या योग्य बनतात. अशा तीन वर्षांनी खडलेल्या बांबूंना कीड किंवा रोगाचा विशेष त्रास होत नाही.
जरी बांबूच्या बेटाच्या मध्यभागातून बांबू काढणे अवघड असले तरी त्यासाठीही काही पद्धती वापरता येतात. बांबू साधारण पहिल्या पेराच्या वर कापला जातो. ह्यामुळे उरलेल्या बांबूच्या कापलेल्या भागातून काहीही रोग मुळाकडे शिरत नाही.