Shri Bhargav Fibres

© २०१३ श्री भार्गव फायबर्स                                                                                                                                                  

मुख्य पान आमच्याबद्दल तंत्रज्ञान उपयोग संपर्क

बांबू पिठूळ व गोड असल्यामुळे कीटक आणि बुरशी त्याच्यावर जोरदार हल्ला चढवतात.

बांबू कापल्यावर 24 तासाच्या आत त्याच्या वरच्या, आकाराने लहान भागाजवळ एक धातूचे टोपण बसवले जाते. मग दहा लिटर पाण्यात १५० ग्राम बोरिक अॅसिड विरघळवून ते बांबूमध्ये दाब लावून जोरात घुसवले जाते. ह्या उपचारांमुळे बांबूतील पांढरट / पिवळट चिकट भाग काढला जाऊन तो किडे आणि बुरशीला बळी पडत नाही.

निरनिराळ्या पद्धतीने, उदाहरणार्थ, गरम वाफेने वाफलुन, अथवा वाहत्या पाण्यात बुडवून ठेवून, तसेच पेराजवळ बारीक भोके पाडून दहा लिटरमध्ये १५० ग्राम बोरिक अॅसिड विरघळवलेल्या पाण्यात बुडवून ठेवून बांबूवर उपचार करता येतात.

 

बांधकाम व इतर रचनात्मक कामांसाठी वापरण्यासाठी बांबूवर रसायने न वापरता पारंपरिक पद्धतीने उपचार करता येतात. हे किती परिणामकारक आहेत हे नक्की सांगता येत नाही. परंतु हे उपचार खास उपकरणे न वापरता गावाच्या पातळीवर करता येतात व यांना जवळ-जवळ काही खर्च येत नाही. साध्या किंवा चुन्याच्या पाण्यात भिजवणे, धुरी देणे ही याची उदाहरणे आहेत.

 

व्यवस्थित काळजी घेऊन मोकळ्यावर नीट साठवल्यास बांबू कुजणे व किडणे यांपासून वाचवता येतात. बांबू उंचावर एकावर एक आडवे ठेवावेत म्हणजे त्यातील पाण्याचा निचरा होईल आणि हवा खेळेल.

 

क्लस्टरच्या कोर क्षेत्रातील बांबू कापणी करणे अवघड असले तरी, असे करण्यासाठी काही पद्धती वापरल्या जाऊ शकतात. सामान्यत: बांबू पहिल्या नोडापेक्षा कापणी करतात जो संक्रमणा कापसाच्या उरलेल्या अवशेषांपासून मुळांच्या मुळापासून जात असतो.

 

उपचार